शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ   

नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे आदेश  

पुणे : नागपूर हिंसाचार घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या आदेशानुसार शहरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुध्दा पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
 
नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला.  या वादातून दगडफेक, तसेच वाहने जाळण्याची मोठी दृर्घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी ६० ते ७० जणांना ताब्यात घेतले आहे. सद्यस्थितीत नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील वेगवेगळ्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना घडामोडींवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. संवेदनशील भागांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना सुध्दा देण्यात आल्या आहेत. 
 

Related Articles